
वार्नर म्युझिक ग्रुप आणि डिजिटल मनोरंजन कंपनी जेट सिंथेसिस यांनी भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीसह जेट सिंथेसिस हिंदुस्थानचा संगीत लेबल परवाना आणि अधिग्रहण, कलाकार व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट, संगीतातील मूळ सामग्री निर्मिती, शॉर्ट व्हिडीओ, चित्रपट तसेच मोबाईल गेमिंगसंबंधित सर्व गोष्टींसाठी डब्ल्यूएमजीचे अधिकृत भागीदार बनले आहे. कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये मनोरंजन क्षेत्रात 200 कोटींची गुंतवणूक करेल.






























































