पर्यावरण रक्षणासाठी केसी कॉलेजचा पुढाकार;‘रीरौटिंग फ्रॉम कोड रेड टु कोड ग्रीन’ उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण सगळेच निसर्गाला पूज्य मानतो. निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवले, हिरव्या शिवारावर, छान धबधब्यासोबत, उंच डोंगरांमध्ये स्वच्छ हवेत काही काळ विश्रांती घ्यायला कुणाला नाही आवडत… खरं आहे ना? पण आपण, अर्थात मानव, निसर्गाच्या सांगोपनासाठी काय प्रयत्न करतो? लोप पावत चाललेल्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आपण थांबवत आहोत का? यासाठी तुम्ही काहीही पाऊल उचलत आहात का? आपली हिरवी शहरे, खरंच हिरवी आहेत का?,आता पर्यावरण रक्षणासाठी केसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

हल्लीच संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल समितीने दिलेल्या ‘कोड रेड फॉर ह्युमनिटी’ या धोक्याच्या इशाऱ्याला प्रतिसाद देत एच. एस. ऐन. सी. विश्वविद्यालयाच्या कीशीनचंद चेलाराम कॉलेजचे (केसी) विद्यार्थी निसर्ग संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढे आले आहेत. या विद्यार्थी मित्रांनी आपल्या शिक्षक वर्गासोबत ‘रीरौटिंग फ्रॉम कोड रेड टु कोड ग्रीन’ हा विविध उपक्रमांने सुसज्ज असा कार्यक्रम आखला आहे. मानवाने निसर्गाची जपणूक न घेता जो अयोग्य मार्ग स्वीकारला आहे तो आपल्याला लवकरच विनाशाकडे घेऊन जाईल ही माहिती लोकांपर्यंत पोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आपली वसुंधरा सुरक्षित आणि आनंदी बनवण्यासाठी पुनः एकदा आपण स्वतःला निसर्ग संवर्धनाच्या रस्त्यावर आणणे म्हणजेच रीरौटिंग होय.

या तरुण ब्रिगेडने स्थानिक ते जागतिक स्तरावर अनेक उपक्रम आयोजित केले आहेत. केसी कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग, मनोरंजक स्पर्धा, स्किल बिल्डिंग वर्कशॉप, जाणकार व्यक्ती आणि तज्ञांचे वेबिनार, मॉडेल बनवणे, तसेच ग्रीनाथॉन आणि पर्यावरणीय परिषदेमार्फत स्वच्छ आणि हरित पर्यावरणाच्या पुनःस्थापनेशी संबंधित विविध समस्या आणि उपायांवर लक्ष वेधणार आहेत. सोमवारी (दि. ११ ऑक्टोबर) सायंकाळी ०४.०० वाजता झूम तसेच केसी कॉलेजच्या यूट्यूब चॅनलवर या उपक्रमाचा ‘कर्टन रेझर’ कार्यक्रम म्हणजेच शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होत ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.