रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसात जोरदार पावसाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसाचे राज्याला चांगलाच तडाखा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात परतीच्या पावसाचे धुमशान सुरुच आहे. अजून आठवडाभर तरी मॉन्सून राज्यात सक्रिय असण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या मुंबईतील कुलाबा वेधशाळेने आगामी दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह व वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नारिकांनी सर्तकता बाळगळ्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.