मिनलच्या वागण्याने सोनालीला अश्रू अनावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉसच्या घरात सदस्यांना चांगले-वाईट अनुभव येत असतात. तर यात काही आपुलकीची नातीही निर्माण होतात. असेच काहीसे सोनालीबाबत झाले. मीनल आणि सोनाली दोघींमध्ये चांगली मैत्री आहे. मात्र त्यांच्या मैत्रीत दुरावा आला आहे. मिनलच्या वागण्याने सोनाली दुखावली गेली आहे. सोनालीला याच कारणामुळे अश्रु अनावर झाले, आणि ती विशालसमोर मन मोकळं करताना दिसणार आहे. सोनालीच म्हणण आहे “इतक पण अंडरस्टॅंडिंग नाहीये का ? मला मीनलचं वागणं नाही आवडलं. इतक कोणाला इग्नोर करण बरं नाही. मला इतक वाईट कधीच नाही वाटलं”.