
भीमा नदीच्या खोऱयात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण 110 टक्के भरले आहे. धरणात पाण्याची आवक अद्यापि सुरूच असल्यामुळे उजनीतून भीमा नदीपात्रात 40 हजार क्युसेक, तर वीर धरणातून 4800 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, पंढरपुरातील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. तर, घाटांच्या पायऱयांवर पाणी पोहोचले आहे. दरम्यान, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
उजनीतून भीमा नदीपात्रात 40 हजार क्युसेकने, तर वीरमधून 4800 क्युसेकने पाणी सोडले जात होते. सध्या वीरमधून विसर्ग सोडणे बंद केले आहे. मात्र, उजनीतून सोडलेल्या विसर्गाचा प्रवाह पंढरपूर येथे 25 हजार क्युसेक आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीवेळी नदीपात्रात सोडण्यात येणाऱया विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चंद्रभागा नदीपात्रात येणाऱया वारकरी व भाविकांना नगरपालिका प्रशासनाकडून ध्वनिक्षेपनाद्वारे वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.


























































