समीर वानखेडे यांच्यावर पाळत नाही, गृहमंत्री वळसे-पाटील यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याच्या कोणत्याही सूचना मुंबई पोलिसांना दिलेल्या नाहीत. पाळतीबाबत त्यांनी केलेल्या आरोपांविषयी मला काहीही माहिती नाही असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

मुंबई पोलिसांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, वानखेडे यांच्या आरोपांविषयी मला काही माहिती नाही. माहिती घेऊन मी त्यावर बोलेन. सीबीआयचे संचालक सुबोध जायस्वाल यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. त्यावरही दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केले. ‘सीबीआय डायरेक्टर म्हणून त्यांना समन्स बजावलेले नसून ते साक्षीदार म्हणून समन्स बजावले आहेत. रश्मी शुक्ला प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. त्यावेळी ते डीजी होते,’ असेही वळसे-पाटील म्हणाले.