राज्यातील नऊ कोटींहून अधिक नागरिकांचे कोविड लसीकरण; आदित्य ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील नऊ कोटींहून अधिक नागरिकांचे आजपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज दिली. राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 2 कोटी 76 लाख आहे. ही संख्या देशातील इतर कोणत्याही राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

आदित्य ठाकरे यांचे ट्विट

‘महाराष्ट्राने लसीकरणात नऊ कोटींचा टप्पा पार केला आहे. दोन्ही लस घेतलेल्यांच्या संख्येत देशात राज्य आघाडीवर आहे.’