
नदीत मासेमारी करताना एक विचित्र तोंडाचा मासा सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना झारखंडच्या धनबाद इथली आहे. हा मासा पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे.
धनबाद येथील गोविंदपूर गावात काही ग्रामस्थ येथील नदीत मासेमारी करायला गेले होते. त्यांनी माशांसाठी जाळं टाकलं. थोड्यावेळाने जाळं ओढून घेण्यात आलं तेव्हा त्यात एक मोठा मासा आढळून आला.
या मोठ्या माशाचं तोंड मगरीसारखं होतं. त्याचे दात करवतीच्या दातांसारखे दिसत होते. लोकांनी उत्सुकता म्हणून एक लाकडाची काठी त्याच्या तोंडात दिली. त्याने काही सेकंदात त्या काठीचा भुसा केला.
या माशाचं नाव सध्या क्रोकोडायल फिश असं ठेवण्यात आलं आहे. या माशाला पाहायला गावकऱ्यांची रीघ लागली आहे. अशा प्रकारचा मासा कधीच कुणीही पाहिलेला नाही. त्यामुळे या माशाला नेमकं काय म्हणतात, हेही त्यांना ठाऊक नाही.






















































