हिम्मत सिंह बनण्या मागची कथा उलगडणार, Special ops 1.5 चा ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी के के मेनन याची मुख्य भुमिका असलेली Special ops ही सीरीज प्रदर्शित झाली होती. नीरज पांडे दिग्दर्शित या सीरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता Special ops 1.5 चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून आगामी सीजनमध्ये हिम्मत सिंह बनण्या मागची कथा उलगडणार आहे.

पहिल्या सीजनमध्ये हिम्मत सिंह एका दहशतवाद्याला पकडण्याच्या मिशनमध्ये गुंतला असतो. परंतु हा हिम्मत सिंह यापूर्वी कसा होता, त्याची जडण घडण कशी झाली हे आगामी सीजनमध्ये दिसणार आहे. आगामी सीजनमध्ये अफ्ताब शिवदासानीही असणार आहे.