मराठमोळा बाहुबली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करत इतिहास रचला आहे. निर्मितीसाठीचे उच्च तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा वापर, मोठमोठे सेटस् आणि त्याला भव्य, उत्तुंग कलात्मक स्वरूप ‘बाहुबली’च्या यशाचे मापदंड ठरले. हा चित्रपट ‘शेमारू मराठी बाणा’ वाहिनीवर आता मराठीत पाहायला मिळणार आहे. अभिनेते -दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची कलात्मक जबाबदारी सांभाळली आहे. डॉ.अमोल कोल्हे यांनी ‘बाहुबली’ला तर ‘देवसेने’साठी सोनाली कुलकर्णीने आवाज दिला आहे. मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस, तर ‘अवंतिका’ या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे. 4 नोव्हेंबरला दुपारी 12 आणि सायंकाळी 7 वाजता चित्रपट प्रक्षेपित होईल.