अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीचे तहसीलदार पिक कापणी प्रयोगासाठी खालगाव येथे जात असताना निवळी ते गणपतीपुळे रस्त्यावर एका हॉटेलबाहेर काळा दगड आणि माती भरलेली तीन वाहने आढळली. त्या तिघांकडे वाहतूकीबाबतचा कोणताही पास नव्हता. पाठोपाठ आलेल्या आणखी एका वाहनामध्ये जांभा दगड भरलेला होता. त्याच्याकडेही पास नसल्याने या वाहनांवर तहसीलदारांनी कारवाई केली.

तहसीलदार शशिकांत जाधव यांनी काळा दगड भरलेल्या तीन वाहनांच्या चालकांकडे वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारणा केली. यावेळी पास नसल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी सुरु असतानाच आणखी एक विनापास जांभा दगडाची वाहतूक करणारे वाहन तहसीलदारांनी पकडले. त्यानंतर तहसीलदारांनी नायब तहसीलदार श्रीमती मणचेकर, मंडळ अधिकारी पाटील करबुड्याचे तलाठी चव्हाण आणि महसूल सहाय्यक अमोल कांबळे यांना खालगाव येथे बोलावून पुढील कारवाईचे आदेश दिले. या चारही वाहनांचा पंचनामा करण्यात आला. त्यांना अनधिकृत गौण खनिज वाहतूक केल्याबददल दंडाची नोटीस देण्यात आली.