
‘झी मराठी’वरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेच्या सेटवर नुकताच एक पाहुणा दाखल झाला. मात्र या पाहुण्याच्या अनपेक्षित एंट्रीमुळे अनेकांना धडकी भरली. या मालिकेचं चित्रीकरण सध्या नाशिकमध्ये सुरू आहे. मालिकेचं चित्रीकरण सुरू होण्याआधी काही काळ सेटवर बिबटय़ाचा वावर होता. काही वेळातच तो बिबटय़ा सेटवरून निघून गेला. हा बिबटय़ा तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
या घटनेनंतर मालिकेत यावर एक सीन शूट करण्यात आला आहे, ज्यात सिद्धार्थ अदितीचं बिबटय़ापासून रक्षण करतो असे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे खरंच सेटवर बिबटय़ा आला की हा केवळ शूटिंगचा एक भाग होता हे स्पष्ट झालेले नाही. झी मराठीवर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती पह्फावत असताना पुन्हा एकत्र कुटुंब पद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. त्यामुळे त्यातील सगळीच पात्रं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.




























































