
टी-20 वर्ल्ड कपनंतर टिम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. त्याबाबतची घोषणा लवकरच होणार असल्याची शक्यता आहे. आता या पदासाठी राहुल द्रविड याने अर्ज केल्याने त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. या पदासाठी द्रविड याने अर्ज केल्याने त्याची निवड निश्चित मानली जात आहे. मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच राहुल द्रविडची युएईमध्ये भेट घेतली होती. त्यात सौरव गांगुली, जय शाह आणि इथर अधिकाऱ्यांनी द्रविडशी प्रशिक्षकपदाबाबत चर्चा केली होती. याआधीही बीसीसीआयने द्रविड याला मुख्य प्रशिक्षकपदासाठी सुचवले होते. मात्र, त्यावेळी द्रविडने नकार दिला होता.
द्रविड एनसीएच्या डायरेक्टरपदी आहेत. त्यांना याच पदावर राहण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी त्यावेळी नकार दिली होती. मात्र, आता टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्रई यांचा प्रशिक्षकपदाची कार्यकाळ संपत असून टिम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे.
युएईमध्ये झालेल्या भेटीनंतर द्रविडने विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर आता त्यांनी या पदासाठी अर्ज केल्याने त्याची निवड निश्चित मानली जात आहे. मुख्य प्रशिक्षक पदासोबतच इतर पदांसाठीही निवड होणार आहे. टिम इंडियाचा माजी यष्टीरक्षक अजय रात्राने फिल्डिंग कोचसाठी अर्ज केला आहे. त्याचप्रमाणे अभय शर्मानेही फिल्डिंग कोचसाठी अर्ज केला आहे. तर बॉलिंग कोचसाठी पारस म्हाब्रे यांच्या नावाची चर्चा आहे. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यावर ते टिम कशी निवडतात, याची उत्सुकता आहे.




























































