मन्नत पूर्ण… अखेर आर्यनला जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी आर्यनचा जामीन अर्ज मंजूर केला. शिवाय अन्य आरोपी अरबाज मर्चंट आणि फॅशन मॉडेल मुनमुन धमेचा या दोघांनाही सोडण्याचे आदेश एनसीबीला दिले. जामीन मंजूर असला तरी न्यायालयाचे निकाल पत्र मिळाल्यानंतरच आर्यन आणि इतर दोघे तुरुंगाबाहेर येतील, असे आर्यनचे वकील अॅड. मुकुल रोहतगी यांनी सांगितले. त्यामुळे या तिघांची आजची रात्रही तुरुंगातच गेली.

क्रूझ ड्रग्स पार्टीप्रकरणी नाकाxटिक्स विभागाने बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन, अरबाज मर्चंट आणि फॅशन मॉडेल मुनमुन धमेचा यांना 2 ऑक्टोबर रोजी अटक केली. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यनने जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आर्यनने सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आर्यनपाठोपाठ अरबाज, मुनमुननेही जामिनासाठी अर्ज केला. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर या याचिकेवर आज सुनावणी झाली. एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी या तिघांच्याही जामीनाला जोरदार विरोध केला. क्रूझवर कमर्शियल क्वांटिटीमध्ये ड्रग्स सापडले आहे. व्हॉट्सअॅपच्या चॅटवरून हे स्पष्ट होते की, त्यांना क्रूझवर ड्रग्स पार्टी करायची होती असे त्यांनी सांगितले.

दुसरा आरोपी अरबाज मर्चंट याच्याकडे तपास अधिकाऱयांना बुटात लपवलेले 6 ग्रॅम चरस सापडले. अरबाज हा आर्यनचा लहानपणीचा मित्र असून ते दोघे टर्मिनलपर्यंत एकाच गाडीतून आले व आर्यनला माहीत होते की अरबाजकडे ड्रग्स आहे. तशी कबुली अरबाजने एनसीबीला दिली होती. मुनमुन धमेचा हिच्याकडूनही अधिकाऱयांनी ड्रग्स जप्त केले आहे तसेच ती इतर आरोपींच्या संपका&त होती व या कटात सामील झाली होती. तसेच आरोपींनी कनिष्ठ न्यायालयात रिमांडला आव्हान दिले नाही तसेच जामीन अर्जालाही आव्हान दिले नाही त्यामुळे अटक बेकायदेशीर असा दावा आरोपी करू शकत नाही. त्यामुळे आरोपींना जामीन देण्यात येऊ नये. न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर आर्यन, मुनमुन आणि अरबाजचा जामीन मंजूर केला. मात्र या आदेशाची प्रत शुक्रवारी सायंकाळी दिली जाणार आहे.

आर्यन 2 वर्षांपासून ड्रग्ज घेतोय

– एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, आर्यन हा गेल्या 2 वर्षांपासून ड्रग्जचे नियमित सेवन करतोय. रेकॉर्डवर तशी माहिती आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये. एवढेच काय तर आर्यनने ड्रग्ज घेतले नसले तरी त्याने ड्रग्ज बाळगल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत.

ऍड. रोहतगी काय म्हणाले…

आर्यनच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, आर्यनकडे ड्रग्स सापडलेले नाही. ते अरबाजकडे होते. ते सर्व क्रूझवर मजा करण्यासाठी गेले होते. मजा करण्यासाठी एकत्र जमणे म्हणजे कट रचणे अथवा कटात सामील होणे असा अर्थ होत नाही. यात कट कारस्थान रचल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज मंजूर करावा.