मागन्या मान्य न झाल्यास पुणे-मुंबई लाँग मार्च! खासदार संभाजीराजे यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आम्ही अनेकदा राज्य शासनासमोर प्रश्न मांडले आहेत. आरक्षणाच्या बाबतीत असो, किंवा इतर बाबतीत राज्याने व केंद्राने आपापली जबाबदारी पार पाडायला हवी. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढला जाईल, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

जनसंवाद यात्रेनिमित्त सोलापूर दौऱ्य़ावर असलेले संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना पुणे ते मुंबई लाँग मार्च काढणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘लाँग मार्चची घोषणा केली असली तरी लाँग मार्च व्हावा, अशी आमची इच्छा नाही. आरक्षणाव्यतिरिक्त ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्याबद्दल आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, मूक आंदोलन केले. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.