
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनीही कंबर कसली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती केली असून भाजपला हरवण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसमुळेच नरेंद्र मोदी यांना बळ मिळाले, अशी टीका बॅनर्जी यांनी केली आहे. तसेच देशात खूप पर्याय आहेत असेही बॅनर्जी म्हणाल्या.
गोव्यात काँग्रेसने फॉरवर्ड पक्षाशी युती करण्यास नकार दिला आहे. आज तृणमूल काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युतीची जाहीर घोषणा झाली. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेस विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात कमी पडत आहे. काँग्रेस ही भाजपची टेलिव्हिजन रेटिंग पार्टी झाली आहे. काँग्रेसने कुठलाच निर्णय न घेतल्याने देशाचे नुकसान होत आहे. देशाकडे अनेक पर्याय असल्याचेही बॅनर्जी यांनी सांगितले.


























































