
निसर्गरम्य पर्यटन स्थळांमुळे गोव्यात दरवर्षी देश- विदेशातील लाखो पर्यटक येत असतात. गेल्या दोन वर्षांत कोविड संकटामुळे पर्यटन उद्योग संकटात असला तरी पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकीय पर्यटन भरभराटीस आले आहे. पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते राहुल गांधी, पेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि आपचे राष्ट्रीय समन्वयक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष तेजस्वी सूर्या आदी नेत्यांनी गोव्यात येऊन आपल्या पक्षाचा जोरदार प्रचार सुरु केला आहे.
निवडणूक जवळ येऊ लागल्याने वातावरण तापू लागले असून भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गोवा दौऱयाना राजकीय पर्यटन असल्याचे सांगून जनता त्यांना थारा देणार नाही असा दावा केला आहे.
हिंदुस्थानात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. देशातील सर्वच राजकीय पक्षांनी याची जय्यत तयारीदेखील सुरू केल्याचे दिसते. यात गोव्याचादेखील समावेश आहे.
पेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवारी दोन दिवसांच्या गोवा दौऱयावर आले असून विकासकामे आणि योजनांच्या उद्घाटनांबरोबर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घटकांबरोबर बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे.
विविध पक्षांच्या नेत्यांच्या राजकीय पर्यटनात अनेक किस्से व्हायरल होऊ लागले आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी एका मंदिरात मिळालेले तीर्थ प्राशन न करता शिंपडल्याने त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. बॅनर्जी यांच्या दौऱयास सुरू होण्याआधी पक्षाने भाजपा नेत्यांना बॅनर्जी पायाखाली चिरडत असल्याचे जारी केलेले पोस्टर वादग्रस्त ठरले होते. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी बॅनर्जी यांच्या पोस्टरना काळे फासून निषेध व्यक्त केला होता.
राहुल गांधी हे दौऱयादरम्यान साध्या हॉटेलमध्ये जेवल्यानंतर मोटरसायकल पायलटसोबत बांबोळी येथून पणजीस आले होते. त्याची छायाचित्रे आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सगळय़ाच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या नेत्यांच्या स्वागतासाठी सगळीकडे बॅनर्स, हार्ंडग्ज आणि पक्षाचे झेंडे लावल्याने गोव्यात येणाऱया पर्यटकांनादेखील राजकीय पर्यटन भरभराटीस आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
z आज सोमवारी गोव्यात दाखल झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी जर गोव्यात आपची सत्ता आली तर आमचे सरकार हिंदूंसाठी अयोध्येला आणि ख्रिश्चनांसाठी वालंकिनी मोफत तीर्थयात्रेचे आयोजन करेल तसेच मुस्लिमांनासाठी आम्ही अजमेर शरीफसाठी तर साईभक्तांना शिर्डीला मोफत दर्शन यात्रा देऊ असे आश्वासन दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल सध्या गोवा दौऱयावर आहेत.



























































