कितीही दडपशाही करा, आम्ही महाराष्ट्रात जाणारच; सीमा भागात मराठी भाषकांकडून काळा दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्ग कायद्याचा बडगा दाखवत मूक सायकल फेरीस परवानगी नाकारली, पोलीस बळाचा वापर करून एकत्र येण्यास अनेक अडथळे केले. तरीही कानडी प्रशासनाची दडपशाही झुगारत आज सीमा भागात मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारविरोधात सुतक व काळा दिवस यशस्वी केला. मराठी भाषिक सीमा लढा चळवळीचे प्रमुख पेंद्र असलेल्या बेळगाव येथील मराठा मंदिरात एक दिवसाचे सत्याग्रह आंदोलन करुन पेंद्र आणि कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. कितीही दडपशाही करा… अडथळे आणा… अत्याचार करा… पण आम्ही महाराष्ट्रातच जाणारच असा एकमुखी निर्धार यावेळी करण्यात आला.

अडवणुकीसाठी मराठी भाषकांच्या घरांसमोर बंदोबस्त

मध्यरात्रीपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी बाहेर पडू नयेत यासाठी त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मराठा मंदिर परिसरात बॅरिकेड्स लावून मराठी भाषिकांना जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीसुद्धा कर्नाटक प्रशासनाची ही दडपशाही मोडून मराठी भाषिक मोठय़ा संख्येने मराठा मंदिरात एकत्र आले. सभागृहात अनेक आंदोलकांनी हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून ढोल बडविणाऱया भाजपवर निशाणा साधला. सीमा भागात भगवा ध्वज फडकवू शकत नसल्याचे सांगत भाजपचे नाव न घेता वाभाडेच काढले.