कांदिवली आग ! हंसा हेरिटेजमधील आगप्रतिबंधक यंत्रणा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली पश्चिम येथील ‘हंसा हेरिटेज’ या उत्तुंग इमारतीला लागलेल्या आगीत दोन जणांचा बळी गेल्यानंतर आता संबंधित इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे समोर आले आहे.

कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवर हंसा हेरिटेज ही 15 मजल्यांची इमारत आहे. या इमारतीच्या 14 व्या मजल्यावर दिवाळीसाठी लावलेल्या पणतीमुळे पडद्याने पेट घेऊन ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या आगीमुळे घरातील एलपीजी सिलिंडरचाही स्फोट झाला. यामुळे लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीच्या घटनेनंतर या इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित आहे का, याची तपासणी केली असता अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.