शिवाजी पार्क जिमखाना निवडणूक; खानोलकर-मुरकर गटाचे उमेदवार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवाजी पार्क जिमखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी माजी सरचिटणीस संजीव खानोलकर आणि दीपक मुरकर पॅनेलने आज आपली उमेदवार यादी जाहीर केली. 13 आणि 14 नोव्हेंबरला या निवडणुकीसाठीचे  मतदान पार पडणार आहे. शिवाजी पार्क जिमखान्याला नावारूपास आणण्यात आमचाही हातभार आहे. कारण मी स्वतः आमच्या पॅनेलसोबत गेली काही वर्षे जिमखान्याच्या विकासासाठी झटलो आहे, असे सांगून पुन्हा निवडून आल्यास जिमखान्याचा नावलौकिक आणि कीर्ती अधिक वाढवण्याची घोषणा करीत  जनरल सेव्रेटरी पदाचे खानोलकर-मुरकर पॅनेलचे उमेदवार आणि माजी जनरल सेव्रेटरी संजीव खानोलकर यांनी जिमखाना सदस्यांना आपल्या पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

यंदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष आणि माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांचा नावलौकिक पाहता त्यांच्याविरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय खानोलकर-मुरकर पॅनेलने घेतल्याचे संजीव खानोलकर यांनी सांगितले. या पॅनेलमधून विश्वस्त पदांसाठी डॉ. विकास दुबेवार, हेमंत परब आणि डॉ. केवल रांका हे तर उपाध्यक्ष पदासाठी अॅड. व्हिक्टर चेट्टीयार, विजयसेन पाठारे आणि समीर पेठे हे निवडणूक रिंगणात आहेत. कार्याध्यक्ष पदासाठी दीपक मुरकर हे उभे आहेत.

पदाधिकाऱयांच्या स्तुत्य कार्याची पावती मताने द्या!

कोरोना काळ हा शिवाजी पार्क जिमखान्याच्या विद्यमान कार्यकारिणीसाठी कसोटीचा काळ होता. या काळात सत्ताधारी प्रवीण अमरे गटाच्या पदाधिकाऱयांनी सभासदांसाठी स्वच्छता, सॅनिटायझेशन आणि कोरोना लसींचे डोस मिळवून देण्यासाठी स्तुत्य अशा उपाययोजना राबवल्या आहेत. जिमखान्याच्या विकासासाठी अनेक वर्षे झटणाऱया अमरे -जोशी गटाच्या पदाधिकाऱयांना शिवाजी पार्क जिमखान्याच्या 2021 च्या निवडणुकीत भरघोस मते देऊन त्याच्या स्तुत्य कामाची पोचपावती द्या, असे आवाहन विद्यमान सहाय्यक जनरल सेव्रेटरी सुनील रामचंद्रन यांनी केले आहे. विद्यमान सत्ताधारी प्रवीण अमरे-अनिरुद्ध जोशी पॅनेलचे सदस्य धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांनी अनेक वर्षे एसपीजीची विविध पदे भूषवली आहेत. जिमखान्याच्या क्रिकेट, टेनिस स्पर्धा व अन्य उपक्रमांना पुरस्कर्ते मिळवून देण्यातही आपल्या पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असे रामचंद्रन म्हणाले.