
मालाडच्या मालवणी येथे महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नूरजहाँ हैदर इंद्रिसी असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नूरजहाँ या मालवणीच्या कलेक्टर कंपाऊंड येथे राहत होत्या. त्या गेल्या काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या. मानसिक आजाराला कंटाळून नूरजहाँने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार तिच्या नातेवाईकाच्या लक्षात आला. त्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. आत्महत्येच्या घटनेची माहिती समजताच मालवणी पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून नूरजहाँच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

























































