काय आहे आजचं राशीभविष्य?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष:- आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. यश मिळेल. मनाजोगती खरेदी कराल.
शुभरंगः पिवळा

वृषभ:- धनलाभ होईल. मन प्रसन्न राहिल. व्यसने मात्र टाळा.
शुभरंगः तांबडा

मिथुन:- मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. जोडीदाराला वेळ देण्याकरिता हा कालावधी उत्तम आहे. कोणावर विसंबून राहू नका.

शुभरंग: काळा

कर्क:- दिवस सुख दुःखात संमिश्र जाईल. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करा. संगीत ऐका.

शुभरंगः चॉकलेटी

सिंह:- दिवस आनंदात जाईल. चैन कराल. जुनी मैत्रिण भेटेल.
शुभरंग: गुलाबी

कन्या:- धनलाभ होईल. शेअर्स खरेदी लाभदायक ठरू शकेल. जवळच्या प्रवासाचा योग आहे.
शुभरंग: मोरपिसी

तुळ:- काही महत्वाचे निर्णय आज घ्यावे लागतील. योग्य सल्ला घ्या. अंतर्मुख व्हा.
शुभरंग: पांढरा

वृश्चिक:- आर्थिक प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या. इतरांचे म्हणणे लक्ष देऊन ऐका.
शुभरंग: हिरवा

धनु:- शुभ समाचार समजतील. संतती बाबतीत सुख लाभेल. तुमचे म्हणणे इतरांना पटेल.
शुभरंग: पोपटी

मकर:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. कष्टाला कमी पडू नका. वेळ दवडू नका.
शुभरंग: क्रीम

कुंभ:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मनासारखी आवक होईल. संधीचे सोने करा.
शुभरंग: अबोली

मीन:- कला प्रांतात चमक दाखवाल. मन आनंदी राहील. कुटुंबास वेळ द्यावा लागेल.
शुभरंग: जांभळा