हिंदुस्थानचा मालिका विजयाचा निर्धार; आव्हान राखण्यासाठी न्यूझीलंडला आज विजयाची गरज 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टिम इंडियाने पहिल्या टी-20 किव्रेट सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करुन विजयी सलामी दिली. उद्या शुक्रवारी लागोपाठ दुसऱया विजयासह तीन सामन्यांची मालिका आधीच खिशात घालण्याच्या इराद्याने हिंदुस्थानी संघ मैदानावर उतरणार आहे. मात्र, मालिकेतील आव्हान राखण्यासाठी न्यूझीलंडसाठी रांचीतील ही दुसरी लढत म्हणजे ‘करा पिंवा मरा’ अशीच असेल.

फलंदाजांचा कस लागणार

न्यूझीलंडकडेही वैविध्यतेने नटलेला गोलंदाजी ताफा असल्यामुळे हिंदुस्थानी फलंदाजीचा उद्या कस लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. रोहित शर्माने जयपूरमध्ये 48 धावांची खेळी केली होती, पण त्यासाठी 36 चेंडू घेतले. टी-20 क्रिकेटमध्ये सलामीच्या फलंदाजाने वन डे स्टाईल फलंदाजी केल्यास आव्हानात्मक धावसंख्या उभारता येणार नाही. डेथ ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केल्याने सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला. त्यामुळे हिंदुस्थानी गोलंदाजांनी पावर प्लेमध्ये धावांची लयलूट करणे अपेक्षित आहे. न्यूझीलंड हा टी-20 क्रिकेटमधील एक सर्वोत्तम संघ आहे. त्यामुळे उद्याची लढाई हिंदुस्थानसाठी नक्कीच सोपी नसेल. उद्याच्या लढतीतही हिंदुस्थानी गोलंदाजांनाही अचूक गोलंदाजी करावी लागणार आहे.

आजची लढत

हिंदुस्थान-न्यूझीलंड, रांची

सायंकाळी 7 वाजता