
12 नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानंतर (एनएएस) दिवाळीच्या सुट्टय़ा पुढे जोडून घेतलेल्या राज्यातील अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सोमवार, 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
दिवाळीच्या सुट्टीसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने दोन वेगवेगळे निर्णय जाहीर केल्याने शाळांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. काही शाळांनी दिवाळीची सुट्टी 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत घेतली तर काहींनी 1 नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टी घेतली. या शाळांनी 12 नोव्हेंबरला सर्वेक्षणादिवाशी शाळा उघडून पुन्हा 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जोडून घेतली आहे. त्यामुळे या शाळा आता सोमवार, 22 नोव्हेंबरपासून सुरळीतपणे सुरू होणार आहेत.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणनंतर शाळांना स्थानिक स्तरावर दिवाळीच्या सुट्टय़ा नाताळ अथवा इतर सणांच्या काळात जोडून घेण्यासाठी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे काही शाळांनी दिवाळीची सुट्टी वाढवून घेतली. मात्र आता 22 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व शाळा सुरळीत होणार आहेत.



























































