रेडिओ दुर्बिणीने शोधले 11 तारे, बर्नाली दासचे महत्त्वपूर्ण संशोधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सूर्यापेक्षा आकारमान व तापमान जास्त असलेल्या आणि पृथ्वीपासून 154 प्रकाशवर्षे दूर असलेल्या 11 मेन्स सिक्वेन्स रेडिओ पल्स एमिटर म्हणजेच दुर्मिळ ताऱयांचा शोध पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील संशोधकांनी लावला आहे. अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप या रेडिओ दुर्बिणीद्वारे हा शोध लावण्यात आला आहे.

पुणे येथील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात पीएच.डी. करणारी बर्नाली मेन्स सिक्वेन्स रेडिओ पल्स एमिटर ताऱयांवर संशोधन करत आहे. बर्नालीने खगोलशास्त्र्ाात नवा अध्याय लिहिला आहे. 2000 मध्ये शास्त्र्ाज्ञांनी एक दुर्मिळ तारा शोधला होता. त्यानंतर आता बर्नाली दास हिने दोन वर्षांत 11 ताऱयांचा शोध घेतला आहे. संशोधनासाठी अमेरिकेतील कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज ऍरेस या दुर्बिणीचाही वापर करण्यात आला. या संशोधनामुळे ताऱयांच्या उत्सर्जनाच्या संकल्पनेला नवी दिशा मिळून ताऱयांच्या चुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासाला वेग मिळेल अशी संशोधकांना आशा आहे. या संशोधनाची माहिती बर्नाली दासने दिली. या वेळी संशोधनातील तिचे मार्गदर्शक डॉ. पूनम चंद्रा, एनसीआरचे संचालक प्रा. यशवंत गुप्ता, प्रा. जयराम चेंगलूर, डॉ. जे. के. सोळंकी आदी उपस्थित होते. दुर्मिळ ताऱयांच्या संशोधनाचा शोधनिबंध द ऍस्ट्रोफिजिकल जर्नलने स्वीकारला आहे.