
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके यांचा जामीन अर्ज सोमवारी किल्ला कोर्टाने फेटाळला. त्यामुळे गोपाळे व कोरके यांना जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागेल.
सदर गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे आहे. ऐन दिवाळीत सीआयडीने या दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली होती. सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी दोघांच्याही जामीन अर्जावर सुनावणी झाली. या वेळी विशेष सरकारी वकील आणि गोपाळे व कोरके यांच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी दोघांचा जामीन अर्ज फेटाळला.






























































