सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे 15 डिसेंबरपासून सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धास्ती वाढवली असतानाच केंद्र सरकारने 15 डिसेंबरपासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. कोरोना महामारीची सुरुवात झाल्यानंतर 23 मार्च 2020 पासून देशातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केली होती. केवळ 28 देशांशी झालेल्या एअर बबल करारांतर्गत गेल्या वर्षी जुलैपासून विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे चालवली जात आहेत. त्यानंतर आता 15 डिसेंबरपासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली जाणार आहेत. दक्षिण आफ्रिका, चीनसह 14 देशांसाठी मात्र मर्यादित सेवा असेल.