
कानपूरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये हिंदुस्थानचा संघ आघाडीवर आहे. न्यूझीलंडला 296 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर हिंदुस्थानने 63 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल हे मैदानात आहेत.
न्यूझीलंडला पहिल्या डावात 300 च्या आत रोखण्यात अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या दोन फिरकी गोलंदाजांनी मोलाची भूमिका निभावली. अक्षर पटेल याने पाच बळी घेतल, तर अश्विनने तीन बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. या दरम्यान अश्विनने इतिहास रचला आणि पाकिस्तानचे माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम यांचा विक्रम मोडला.
आर. अश्विन याच्या नावावर सध्या 80 लढतीत 416 बळींची नोंद झाली आहे. वसीम अक्रम यांच्या नावावर 104 लढतीत 414 बळींची नोंद होती. हा विक्रम आता अश्विनने मोडला असून आता त्याच्या निशाण्यावर हरभजन सिंग याचा 417 बळींचा विक्रम आहे. कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात किंवा मुंबईतील कसोटीत हा विक्रमही अश्विन मोडेल अशी आशा आहे.
INDvsNZ कानपूर कसोटीत घडली भन्नाट घटना, ‘बॉलर’ जाडेजाने घेतली ‘बॅटर’ रविंद्रची विकेट
अश्विनने आतापर्यंत हिंदुस्थानकडून 80 लढती खेलल्या असून यात त्याने 24.63 च्या सरासरीने 416 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याने कसोटीत 5 विकेट्स घेण्याची कामगिरी 30 वेळा, तर 10 विकेट्स घेण्याची कामगिरी 7 वेळा केली आहे. तसेच हिंदुस्थानकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये त्याचा चौथा क्रमांक लागत आहे. या यादीत अनिल कुंबळे 619 बळींसह पहिल्या, कपिल देव 434 बळींसह दुसऱ्या आणि हरभजन सिंह 417 बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे.
Ashwin picks up his second as Jamieson departs for 23.
Live – https://t.co/9kh8Df6cv9 #INDvNZ @Paytm pic.twitter.com/jmOdDno07i
— BCCI (@BCCI) November 27, 2021
2021 मध्ये सर्वाधिक विकेट्स
2021 मध्ये आर. अश्विन याने दमदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 40 बळी घेतले आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याचा 39 बळींना अश्विनने मागे सोडले आहे.




























































