
अभिनेता तुषार दळवी याची मुख्य भूमिका असलेल्या ‘सोनी’ वाहिनीवरील ‘मेरे साई ः श्रद्धा और सबुरी’ या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच या मालिकेने एक हजार भागांचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने मालिकेत आता नव्या अध्यायाला सुरुवात होणार असून साईजन्माची कथा मालिकेत पाहायला मिळणार आहे, जी आजवर कधीही सांगितली गेली नाही.
तुषार दळवी म्हणाले, ‘मेरे साई ः श्रद्धा और सबुरी’च्या समस्त टीमने शिर्डीच्या साईमंदिराला भेट दिली. साईंच्या जन्माची कथा मांडण्याची संधी आम्हाला मिळत आहे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. प्रेक्षकांचे आमच्यावरील प्रेम असेच अखंड राहील. मालिकेत गिरीश ओक, किशोरी गोडबोले, बालकलाकार गुणव मल्होत्रा यांच्याही भूमिका आहेत. ही मालिका 29 नोव्हेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सात वाजता ‘सोनी’ वाहिनीवर पाहायला मिळेल.






























































