
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार का, याचा निर्णय उद्या होणाऱया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच घेतला जाणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागामार्फत 29 नोव्हेंबरला महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासमोर सादर होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळांविषयी जो निर्णय होईल त्यानुसार आयुक्तांकडून मुंबईतील शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असल्याने मुंबईत 1 डिसेंबरपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच शालेय शिक्षण विभागाकडून यासंदर्भात शासन निर्णयदेखील जारी केलेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेने शाळा सुरू करण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे. शाळांचेदेखील शिक्षण विभागाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिह्यांतही सर्व शाळा सुरू होणार असल्याने आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व शाळा, जिल्हे, महापालिका, नगरपालिका, छावणी बोर्ड यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील शाळांसंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मार्गदर्शक सूचना
n दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर.
n मास्क वापरणे बंधनकारक.
n हात धुणे, सॅनिटायझरचा वापर.
n शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांचे लसीकरण आवश्यक.
n कंटेन्मेंट झोनमधील शाळा बंदच.
n कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱया शिक्षक, विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी नाही.
n सामूहिक प्रार्थना, गर्दीचे उपक्रम टाळावेत.
n बायोमेट्रिक उपस्थिती पद्धत टाळावी.
n जलतरण तलाव वापरू नये.
n ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेत प्रवेश मिळणार.
n विद्यार्थी वाहतूक करणाऱया वाहनांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
n विद्यार्थी, शिक्षकांचे मानसिक समुपदेशन करावे.
n कोरोनाबाधित विद्यार्थी वर्गात आढळल्यास त्याच्या संपर्कातील विद्यार्थ्यांना निकट सहवासित मानले जावे.
n कोरोना रुग्ण सापडल्यास संपूर्ण शाळेचे सॅनिटायझेशन करून घ्यावे.
n जे विद्यार्थी क्वारंटाइन होतील त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी.



























































