
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुह्यात अटकेत असलेले निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला. 7 डिसेंबर रोजी न्यायालय निकाल देणार आहे.
खंडणीच्या गुह्याचा तपास सीआयडी करत आहे. सीआयडीने या दोन्ही अधिकाऱयांना अटक केली. सध्या हे अधिकारी न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघांचाही जामीन अर्ज किल्ला कोर्टाने नाकारल्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार दोघांच्याही जामीन अर्जावर आज युक्तिवाद झाला. गोपाळे व कोरके यांच्या बाजूने अनिकेत निकम तर विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी सीआयडीची बाजू मांडली. आता 7 तारखेला कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


























































