ओमायक्रॉनमुळे नियमांची कडक अंमलबजावणी, कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभर थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका पाहता जिल्ह्यात राज्य शासनाच्या सूचनेनुसार बुधवारपासून कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी ‘नो मास्क, नो लस, नो एन्ट्री’सह विनामास्क असलेल्यांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, शासनाचा पुढील आदेश येइपर्यंत इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा नियमावलीनुसार उद्यापासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंट धोका ओळखून देशात खबरदारी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. या घातक विषाणूला घाबरून चालणार नाही. येणाऱया परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असून, नागरिकांनी यासाठी शासनाच्या सूचना आणि नियमावलीचे स्वयंपालन करणे गरजेचे आहे. ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ हा उपक्रम जिह्यात यशस्वी ठरला. आता याच पद्धतीने ‘दोन्ही लस नाही, मास्क नाही, तर प्रवेश नाही’ ही मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे. कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, पर्यटन, प्रवास असो वा दुकानामध्ये खरेदी करताना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. परराज्यांतून येणाऱया नागरिकांजवळ 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर अहवाल, दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय जिह्यात प्रवेश मिळणार नसल्याचे रेखावार यांनी सांगितले. कोरोनापाठोपाठ आता ‘ओमायक्रॉन’ला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा, कोविड सेंटर ते आरटीपीसीआर तपासणी केंद्र सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

अनेक उपाययोजना करून जिह्यात आतापर्यंत 88 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर दुसरा डोस घेणाऱयांची सरासरी 43 टक्के आहे. यामध्ये वैद्यकीय कारणांमुळे काहीजणांना डोस घेता आले नसला तरी अशा नागरिकांनी याबाबत डॉक्टरांचे तसे वैद्यकीय प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक आहे, तसेच जिल्ह्यातील गळीत हंगाम मध्यावर असून, लसीकरणाबाबत साखर कारखान्यांनी सहकार्य केल्याने ऊसतोड मजुरांचेही लसीकरणही पूर्ण होत असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.

कर्नाटक हद्दीलगत तपासणी केंद्र

n महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल, तसेच कोरोना प्रतिबंधकचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येत नाही. त्याप्रमाणे आता परराज्यांतून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात येणाऱया नागरिकांजवळ 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर अहवाल, दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. महाराष्ट्रात येणाऱया नागरिकांचीही अशाचप्रकारे तपासणी होणार आहे. यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तपासणी नाके आजपासून सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.

बाधित देशातील एकही रुग्ण जिह्यात नाही

n आंतरराष्ट्रीय प्रवास करून येथील विमानतळावर येणाऱया प्रवाशांचीही शासनाच्या नियमानुसार तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत बाधित देशातून एकही प्रवासी जिल्ह्यात आला नसल्याची माहिती येथील विमानतळ व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

कर्नाटकात प्रवेशासाठीही आरटीपीसीआर रिपोर्टची सक्ती

n मिरज-कागवाड या राज्य महामार्गावर कर्नाटक पोलीस व कर्नाटक शासनाच्या आरोग्य विभागाचे पथक संयुक्तरीत्या काम करीत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱया वाहनांना अडवून त्यांच्याकडून आरटीपीसीआर रिपोर्टची तपासणी केली जात आहे. त्यानंतर रिपोर्ट पाहूनच वाहने कर्नाटकात सोडली जात आहेत. ज्यांच्याकडे आरटीपीसीआरचा रिपोर्ट नाही, अशा वाहनधारकांचे तेथेच स्वॅब घेऊन त्यांना सोडले जाते.

परदेशातून नगरमध्ये येणाऱयांवर नजर!

नगर ः ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध जारी झाले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी मनपाची पथके कार्यरत करण्यात येणार आहेत. दरम्यान, परदेशातून नगरमध्ये येणाऱया व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यांना गृहविलगीकरण व संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नव्याने निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार मनपा दक्षता पथकांकडून मास्क न वापरणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कडक कारवाई!

सातारा ः कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नवीन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधाची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर दंडात्मक कारकाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे. दरम्यान, कोरोनाचा कहर कमी होत असला, तरी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यासाठीच्या उपाययोजना राबवत असताना सापडणाऱया बाधितांवर योग्य ते उपचार करण्यावर जोर देण्यात येत आहेत. बाधित सापडण्याचे प्रमाण कमी होत असतानाच काही तालुक्यातील बाधित संख्या शून्यावर आली आहे