
हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी यासाठी अनेक जण दारूचे सेवन करतात, परंतु थंडीच्या मोसमात अति मद्यपान करणे हृदयासाठी अतिशय घातक ठरू शकते. याबाबत मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि लीलावती हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरचे कन्सल्टंट कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे म्हणाले की, अतिमद्यपानामुळे हृदयावरच नव्हे तर शरीरावरही विपरीत परिणाम होतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊन ते कमकुवत होतात. ज्यामुळे हृदयाचे पंपिंग व्यवस्थित होत नसल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.























































