
हिवाळी अधिवेशनात शक्ती विदेयक मंजूर होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य महीला आयोगाचा अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. त्या आज चंद्रपूरात आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्या अशा म्हणाल्या आहेत.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणल्या की, ‘उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखा असतो, त्यामुळे या कायद्या अंतर्गत महीलांना सूरक्षा तर मिळेलच सोबतच त्यांना न्याय देण्याची प्रक्रिया जलद गतीने होईल. कोरोनाचा पार्श्वभूमीवर बालविवाहाचे प्रमाण प्रचंड वाढले. बाल विवाह प्रतिबंधक कायदा असूनही ऐवढ्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. बालविवाहाची आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे. म्हणून राज्य महीला आयोगाचा वतीने राज्य सरकारला शिफारस करण्यात आली आहे की, जोपर्यंत बालविवाहाचा चळवळीत लोकप्रतिनीधींचा सहभाग होणार नाही, तोपर्यत बालविवाह थांबणार नाहीत. बालविवाह थांबवायचे असतील तर बालविवाहाचा कायदा अधिक कठोर करायला हवे, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.



























































