
वर्षभर लढा देऊन केंद्रातील मोदी सरकारला नमवणाऱया शेतकऱयांनी गुरुवारी रात्री दिल्लीच्या सिंघू सीमेवरून आंदोलनाचे ‘पॅकअप’ सुरू केले. रात्रभर तंबू हटवल्यानंतर अनेक शेतकऱयांनी शुक्रवारी सकाळी गावचा रस्ता पकडला. आंदोलनातील ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी शेतकऱयांनी आपल्या ट्रक्टर्सवर रंगीत विद्युत रोषणाई केली आणि विजयाच्या घोषणा देत दिल्लीची सीमा सोडली.
तिन्ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर इतर मागण्यांबाबत शेतकऱयांनी आपले आंदोलन सुरू ठेवले होते. सरकारने उर्वरित मागण्याही मान्य केल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने गुरुवारी शेतकरी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सिंघू, टिकरी आणि गाझियाबादच्या सीमेवरील शेतकऱयांनी आंदोलनस्थळावरील आपल्या सामानाची आवराआवर करीत घरवापसी सुरू केली. मोठय़ा संख्येने ट्रक्टर्स परतीच्या मार्गाला लागले. याचकेळी पंजाबमधील विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिल्लीतील गुरुद्वारा श्री बंगला साहिबपुढे माथा टेकून कृतज्ञता व्यक्त केली. 15 महिन्यांच्या आंदोलनानंतर मिळालेले ऐतिहासिक यश शनिवारी ‘विजयी मार्च’ काढून साजरे केले जाणार आहे. यावेळी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी एकाचवेळी घराच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.
अन्याय के अंधेरे को हिम्मत से हराएंगे…! राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला टोला
शेतकरी आंदोलकांना वेळोवेळी खंबीर साथ देणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्किटरच्या माध्यमातून केंद्र सरकारला टोला लगावला. या सत्याग्रहाची आज शेवटची रात्र आहे, असे नमूद करतानाच त्यांनी ‘अन्याय के अंधेरे को हिम्मत से हराएंगे, न्याय की राह पर यूँ ही आगे बढते जाएंगे’, अशा शब्दांत सरकारवर निशाणा साधला.




























































