
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील पंथ चौक परिसरात सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या बसवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात 2 जवान शहीद झाले असून 12 जावन जखमी झाले आहेत. हा हल्ला जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या 9वी बटालियन सशस्त्र पोलीस बसवर झाला आहे. ताज्या माहितीनुसार, सर्व जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाने संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.





























































