लातूरकरांची चिंता वाढली; जिल्ह्यात ‘ओमायक्रॉन’चा रुग्ण आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण लातूरमध्ये आढळला आहे. यामुळे लातूरकरांची चिंता वाढली आहे. याबाबत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, आता जिल्ह्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

हा रुग्ण दुबई येथून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्या रुग्णात सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. तरी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. पुढील तपासणीसाठी त्याचे नमुने पाठवण्यात आले आहेत. लातूरकरांनी कोरोनाचे नियम पाळावेत, मास्क वापरावा, गर्दी करु नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.