चंद्रपूरमध्ये आज नगर पंचायत निवडणूकांसाठी मतदान, 303 उमेदवार मैदानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
votters

चंद्रपूर जिल्ह्यात आज 6 नगर पंचायत निवडणूकीसाठी मतदान होत आहे. त्यासाठी मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. 102 जागांपैकी 82 जागांवर आज मतदान होणार आहे. उर्वरीत 20 ओबीसी जागांसाठी 18 जानेवारीला मतदान कार्यक्रम नियोजित आहे.

विविध पक्षांचे 303 उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत. दरम्यान यात भाजपा-काँग्रेसची थेट लढत होणार आहे. इतर पक्ष एकूण बलाबल ठरविणार आहेत. जिल्ह्यचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजपनेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी आहे. आज 9.6 अंश तापमान असूनही मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचं चित्र सकाळच्या वेळात दिसलं.

नगरपंचायतसाठी मतदान केंद्रांवर झालेले मतदान

सकाळी – 9.30 पर्यंत
सावली – 7.21
पोंभूर्णां – 9.30
गोंडपिपरी – 8.19
कोरपना – 15.65
जिवती – 9.67
सिंदेवाही – लोनवाही – 6.76
एकूण टक्केवारी – 8.31