
बॉलीवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या सिनेमांचे सिक्वेल आवर्जून केले जातात. प्रेक्षकही अशा सिक्वेलच्या प्रतीक्षेत असतात. अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘रावडी राठोड’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची तयारीही सुरू झाल्याचे समजते. प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील लेखक के. व्ही विजयेंद्र प्रसाद हे या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत.
‘रावडी राठोड’ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा चित्रपटाच्या सहनिर्मात्या शबिना खान यांनी याआधीच केली होती. खरं तर 2020 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. पण करोनामुळे हा चित्रपट रखडला होता. मात्र आता हा चित्रपट प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. ‘रावडी राठोड 2 मध्ये अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. पण दुसऱया भागाची कथा पहिल्या चित्रपटाच्या शेवटापासून सुरू होणार नाही. ती त्यापेक्षा वेगळी असेल असे समजते.



























































