
‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सोशल मीडियावर उर्फीच्या फॅन्स आणि फॉलोअर्समध्ये दिवसागणित वाढ होताना दिसत आहे. ती नेहमीच आपल्या विचित्र पेहराव्यामुळे ट्रोल्सच्या निशाण्यावर असते. मात्र आता ती IndiaToday.in ला दिलेल्या आपल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने ट्रोलर्स, मॅरेज प्लॅन, लव्ह लाईफबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांची बिनधास्त उत्तर दिली आहेत.
इंटरनेट सेन्सेशन असलेली उर्फी जावेद एका मुस्लिम कुटुंबातील आहे. पण तरीही तिला मुस्लिम मुलाशी लग्न करायचे नाही. उर्फीने असेही सांगितले की, ती आजकाल भगवद्गीता वाचत आहे. तिने या मुलाखतीत सांगितलं की, ”मी मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. माझा इस्लामवर विश्वास नसून मी कोणत्याच धर्माला फॉलो करत नाही. म्हणून मला काळजी नाही की, मी कोणावर प्रेम करते. आपल्याला त्याशीच लग्न करायला हवं, ज्याला आपण आवडतो.”
अनेकवेळा उर्फीला तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. ती मुस्लिम असल्यामुळेही तिला ट्रोल केलं जात, असं तिचं म्हणणं आहे. यावर बोलताना ती म्हणाली आहे की, ”मी एक मुस्लिम मुलगी आहे. यामुळेच मला अधिकतर मुस्लिम धर्मीयच ट्रोल करत आक्षेपाहार्य कमेंट करतात. त्यांचं म्हणणं आहे की, मी इस्लामची प्रतिमा मलिन करत आहे.”




























































