नव्या विषाणूची दारावर थाप, वाचा पंतप्रधान मोदींची 2021 मधील शेवटची ‘मन की बात’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मधील आपल्या अखेरच्या ‘मन की बात’ (84वा भाग) या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्याचाही उल्लेख केला.

कोरोनाच्या आणखी एका नव्या प्रकारच्या विषाणूने आपल्या दारावर थाप दिली आहे. गेल्या दोन वर्षातला आपला अनुभव असा आहे, की या जागतिक महामारीचं पराभव करण्यासाठी, एक नागरिक म्हणून आपले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा जो नव्या स्वरूपाचा ओमायक्रॉन विषाणू आला आहे, आपले वैज्ञानिक सातत्याने त्याचे अध्ययन करत आहेत. त्यातून त्यांना योज नवी माहिती मिळते आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांनंतर त्यावर काम केले जात आहे. अशावेळी,स्वयं सजगता, स्वयंशिस्त, ही कोरोनाच्या या स्वरूपाशी लढण्यासाठी, देशाची खूप मोठी ताकद आहे. आपली सामूहिक शक्ती कोरोनाचा पराभव करेल, याच जबाबदारीच्या जाणिवेसह, आपल्या सर्वांना 2022 या वर्षात प्रवेश करायचा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, हे लोकशक्तीचेच सामर्थ्य आहे, सर्वांचे प्रयत्नच आहेत, ज्यामुळे हिंदुस्थान, 100 वर्षातल्या या सर्वात मोठ्या महामारीचा सामना करु शकला. आपण प्रत्येक संकटात, एकमेकांसोबत, एका कुटुंबासारखे उभे राहिलो. आपल्या वस्तीत किंवा शहरात, कोणाची मदत करायची असेल, तर ज्याला जे जे शक्य झाले, त्याने त्यापेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न केला. आज जगात लसीकरणाचे जे आकडे आहेत, त्यांची भारताशी तुलना केली तर लक्षात येईल, की आपल्या देशाने किती अभूतपूर्व कामगिरी केली आहे. किती मोठे उद्दिष्ट पार केले आहेत. लसींच्या 140 कोटी मात्रा देण्याचा टप्पा पार करणे, हे प्रत्येक भारतीयाचे स्वतःचे यश आहे. हा प्रत्येक भारतीयांचा, व्यवस्थेवर असलेला विश्वास दर्शवणारे आहे. आपल्या वैज्ञानिकांवर आपला विश्वास दर्शवणारे आहे. आणि समाजाच्या प्रति असलेली आपली जबाबदारी आपण कशाप्रकारे पार पाडत आहोत, या आपल्या इच्छाशक्तीचा हा पुरावाच आहे.

विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला

कधीच आशा सोडू नका. कधीच असा विचार करू नका की तुम्हाला जे करायचं आहे त्यात तुम्ही कमी पडाल. ते सोपं असणार नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि परिश्रम करावे लागतील. मी अतिसामान्य होतो, आणि आज, मी माझ्या कारकीर्दीत अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. हा विचार करू नका की 12वी बोर्ड परीक्षेचे गुण हे ठरवतील की तुम्ही आयष्यात काय मिळवू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि यासाठी मेहनत करा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.