बिग बॉसमध्ये टास्कदरम्यान देवोलिनाने पँटमध्येच केली सूसू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस हिंदीचे 15 वे सिझन चांगलीच गाजत आहे. बिचुकले, राखी सावंत, देवोलिना भट्टाचार्जी, रश्मी देसाई हे वाईल्ड कार्ड म्हणून घरात आल्यानंतर त्यांना घरात दररोज वाद विवाद होऊ लागले आहेत. मात्र त्याचा बिग बॉसच्या टीआरपीला चांगलाच फायदा झाला आहे.

मंगळवारी तर बिग बॉसच्या घरात देवोलिनाने कहरच केला. तिने चक्क एका टास्कदरम्यान पँटमध्येच सूसू केली. त्याचे झाले असे की, तिकीट टू फिनालेसाठी रश्मी व देवोलिना या एकेकाळच्या जवळच्या मैत्रिणी व आताच्या जानी दुश्मन असलेल्या या दोघींना एक टास्क दिला होता. तो टास्क जो जिंकेल त्याला फिनालेचे तिकीट मिळणार होते. त्या दोघींना घराच्या गार्डन एरिया मधील दोन खांबावर उभे राहायचे होते. खांबाच्या दोन्ही बाजूला दोन पट्ट्या होत्या. त्या पट्ट्यांवर त्या दोघींना उभे राहायचे होते.

त्या दोघींनीही जबरदस्त परफॉर्मन्स देत तब्बल 18 तास त्या दोघी खांबावर उभ्या राहिल्या. या दरम्यान देवोलिनाला लघवीला जायचे होते. मात्र तिला जाता येत नसल्याने तिने प्रतिकला तिच्या अंगावर पाणी ओतायला सांगितले. तो पाणी ओतत असताना तिने खांबावर उभ्या उभ्या पँटमध्येच सुसू केली. देवोलिनाने केलेल्या या गोष्टीमुळे सध्या ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.