
हिंदुस्थानात इलेक्ट्रिक आणि ऑटोमॅटिक कारची मागणी सातत्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक व्यतिरिक्त, ऑटोमोबाईल कंपन्यांनी प्रत्येक सेगमेंटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय असलेल्या कार सादर केल्या आहेत. याच क्रमात टाटा मोटर्स लवकरच आपली Tata Altroz Automatic लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tata Altroz Automatic पुढील तीन ते चार महिन्यांत लॉन्च केली जाऊ शकते. Tata Altroz Automatic ची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. कंपनी लवकरच Tata Altroz Electric ही हिंदुस्थानी बाजारपेठेत सादर करू शकते.
Tata Altroz Automatic च्या गिअरबॉक्सची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. तसेच ही कार पुढील 3-4 महिन्यांत हिंदुस्थानात लॉन्च केली जाऊ शकते. या कारमध्ये पेट्रोल इंजिन पर्यायासह ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो. तसेच डिझेल इंजिनसह फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनसह दिले जाऊ शकते. असे असले तरी टाटा मोटर्सने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या लोक ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या Tata Altroz ची आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसरीकडे, जर आपण याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Tata Altroz Automatic ची किंमत सुमारे 7 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
कंपनीची ही नवीन कार पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन पर्यायासह येईल. ट्रान्समिशन ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर, यात सध्या 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह दिले जाते. यात टर्बो युनिटसह डिझेल आणि पेट्रोल दोन्ही इंजिन मिळतात. याच्या टर्बो पेट्रोल व्हेरिएंट ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह आगामी काळात लॉन्च केला जाईल, असे बोलले जात आहे. Tata Altroz ची सध्याची किंमत 5.89 लाख ते 9.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.




























































