‘विक्रम वेधा’तील फर्स्ट लूक लाँच, वाढदिवशी हृतिकचे चाहत्यांना रिटर्न गिफ्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचा हॅण्डसम हंक अभिनेता हृतिक रोशन याने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. हृतिकने आपल्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. मोठी दाढी, डोळ्यांवर काळा चष्मा, रक्ताने माखलेले शरीर असा हृतिकचा डॅशिंग लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. आतापासूनच चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटात हृतिक गँगस्टरच्या भूमिकेत आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम वेधा’ या तमीळ चित्रपटाचा हा रिमेक असून यात हृतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेदेखील झळकणार आहे.