
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. मंत्री आणि आमदारांच्या राजीनामा सत्रामुळे सुरु झालेली भाजपची गळती काही थांबताना दिसत नाही. योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य, दारासिंह चौहान यांच्यानंतर आज आयुष मंत्री धर्मसिंह सैनी यांनी राजीनामा देत पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्न पाहणाऱया भाजपला चांगलाच झटका दिला आहे. सैनी यांच्या पाठोपाठ तीन भाजप आमदारांनीही राजीनामा देऊन पक्षातील गळती सुरूच ठेवली.
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन दिकसांपासून राजकीय भूकंप होऊ लागले आहेत. गेल्या 48 तासांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्री आणि आमदार मिळून 14 जणांनी राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे यातले बहुतेक मंत्री आणि आमदार ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्क करतात. आयुष मंत्री धर्मसिंह सैनी यांनी गुरुवारी राज्यपालांकडे मंत्रीपदाचा राजीनामा देत पक्ष सोडण्याची घोषणा केली. त्यांच्या आधी औरैयामधील बिधुनाचे आमदार विनय शाव्य आणि फिरोजाबादमधील शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा यांनी स्कामी प्रसाद मौर्य यांना पाठिंबा देत राजीनामे दिले. आमदार बाला प्रसाद अवस्थी यांनीही राजीनामा दिला आहे.
आत्तापर्यंत या चौदा जणांचे राजीनामे
स्वामी प्रसाद मौय, भगवती सागर, रोशनलाल वर्मा, विनय शाव्य, अवतार सिंह भाड़ाना, दारा सिंह चौहान, बृजेश प्रजापति, मुकेश वर्मा, राकेश राठौर, जय चौबे, माधुरी कर्मा, आर के शर्मा, बाला अवस्थी, धर्मसिंह सैनी. राजीनामा देणारे बहुतेक आमदार समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
योगींच्या नेतृत्वावर प्रश्न चिन्ह
एकामागून एक मंत्री राजीनामा देत असताना त्यांच्यासोबत आमदार देखील पक्ष सोडून जात असल्यामुळे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्कगुणांकरच प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. आदित्यनाथ यांनी बुधवारी सैनी यांनी फोन करून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.
सैनी – अखिलेश भेट
राजीनामा दिल्यानंतर धर्मसिंह सैनी यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. अखिलेश यांनी त्यांच्यासोबतचा एक फोटो ट्किट करत माहिती दिली. डॉ. धर्मसिंह सैनी यांच्या आगमनाने आमच्या सकारात्मक आणि प्रगतीशील राजकारणाला अधिक उत्साह आणि बळ मिळाले आहे. समाजकादी पार्टीत त्यांचे हार्दिक स्कागत आणि शुभेच्छा! 2022 मध्ये सर्वसमावेशकतेचा आणि सौहार्दाचा किजय निश्चित आहे, असं त्यांनी म्हटल आहे.
राजीनामा सत्र 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार
राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना सैनी यांनी गंभीर इशारा दिला आहे. गेल्या 5 वर्षांपासून दलित, मागास वर्गाचा आवाज दाबला गेला आहे. स्कामी प्रसाद मौर्य जे म्हणतील ते आम्ही करू. येत्या 20 जानेवारीपर्यंत राजीनाम्याचे हे सत्र सुरूच राहणार असून दररोज एक मंत्री आणि तीन ते चार आमदार राजीनामा देतील, असे त्यांनी सांगितले.































































