
कोरोनामुळे देशात बेरोजगारी वाढत असताना आयआयटी संस्थांमधील विद्यार्थ्यांना मात्र यंदा पॅम्पस प्लेसमेंटने करोडपती बनवले. 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त वार्षिक पॅकेज मिळालेल्या इंजिनियरींच्या विद्यार्थ्यांमध्ये ‘कॉम्प्युटर सायन्स’ अभ्यासक्रमाचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत.
पवई येथील आयआयटी मुंबईतील 1382 विद्यार्थ्यांची यंदा पॅम्पस प्लेसमेंटमध्ये विविध नामांकित पंपन्यांनी निवड केली. त्यातील 12 विद्यार्थ्यांना वार्षिक 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची ऑफर मिळाली. आयआयटी दिल्लीमधील 60 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वार्षिक पॅकेज मिळाले. आयआयटी भुवनेश्वरमधील 35 विद्यार्थ्यांची उबर पंपनीने वार्षिक 2 कोटी 15 लाख रुपये वेतनावर नियुक्ती केली.
1 कोटी रुपयांपेक्षा अधिक पॅकेज मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ‘कॉम्प्युटर सायन्स’चे विद्यार्थी इतर शाखांपेक्षा जास्त आहेत. कॉम्प्युटर सायन्सबरोबरच मशिन लार्ंनग इंजिनियर्स, डिसिजन अॅनालिस्ट्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्या शाखांच्या विद्यार्थ्यांनाही मागणी होती. आयआयटी पाटणामध्ये यावर्षी 87 पंपन्या प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या कंपन्यांनी दिलेल्या एकूण नोकर्यांपैकी 96 टक्के नोकर्या या कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनियरींग शाखेच्या विद्यार्थ्यांना मिळाल्या.
आयआयटी कानपूरमधील 47 विद्यार्थ्यांना परदेशांतील नोकर्यांच्या ऑफर्स मिळाल्या. त्या सव्वा कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहेत. इंटेल, मायक्रोसॉफ्ट, ओला, सॅमसंग, उबर, टायगर अॅनालिटिक्स, अॅक्स्ट्रिया, क्वाडेई या पंपन्यांनी त्या ऑफर दिल्या. आयआयटी रोपरमधील कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाच्या 92 टक्के विद्यार्थ्यांची प्लेसमेंटच्या पहिल्याच टप्प्यामध्ये निवड झाली. त्यानंतर मेपॅनिकल, सिव्हिल आणि मेटॅलर्जिकल अॅन्ड मटेरियल्स इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना पंपन्यांनी प्राधान्य दिले.
भायखळा पूर्व येथील ग्लोरिया शाळेच्या परिसरात असलेल्या लाकडाच्या गोदामांना सोमवारी पहाटे आग लागली. यामध्ये शाळेचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आग पहाटेच्या सुमारास लागल्याने वर्गात विद्यार्थी नसल्याने मोठी जिवीतहानी टळली आहे. मात्र येथे असलेल्या लाकडाच्या गोडाऊनमुळे या ठिकाणी आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी विद्यार्थीनींनी पोस्टर झळकवत या आगीच्या घटना कधी थांबणार असा सवाला केला. तसेच प्रशासनाने दोषींवर कडक कारावाई करावी अशी मागणी केली आहे.





























































