दिव्यांगांच्या वसतिगृहाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे पालक गमावलेल्या दिव्यांग बालकांकरिता विरार, अर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून 20 जानेवारी रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या वसतिगृहाची निर्मिती नूतन गुलगुले फाऊंडेशनद्वारे करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत काम करणाऱ्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या मान्यतेने सुरू झालेले हे पहिले वसतिगृह असल्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा, विश्वस्त नूतन गुलगुले यांनी सांगितले. स्वानंद सेवा सदन असे या वसतिगृहाचे नाव असून कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांना येथे राहण्याची सुविधा आहे.