
राज्यभर गाजत असलेल्या आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या डॉ. रेखा यांचे पती डॉ. नीरज कदम यास अखेर अटक करण्यात आली आहे. आज पहाटे ही अटक आर्वी पोलिसांनी केली. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक, पोस्को अंतर्गत ही अटक करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंके यांनी सांगितले आहे.


























































