वैयक्तिक विक्रम नोंदविण्यात मला रस नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदाकरून तडकाफडकी राजीनामा देणारा विराट कोहली आता नेतृत्काच्या बाबतीत बीसीसीआयशी कोणतीही तडजोड करण्याच्या मूडमध्ये नाहीय. त्यामुळेच मला क्रिकेटमधील माझ्या वैयक्तिक विक्रमांमध्ये मुळीच रस नाही आणि कर्णधार म्हणून एक कसोटी अधिक खेळून असा काय फरक पडणार आहे,असा सकाल करीत विराटने त्याच्या कारकिर्दीतील 100 क्या कसोटीत तरी त्याने हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व करावे हि हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय ) ऑफर धड्कालून लालली आहे.विराट आतापर्यंत संघासाठी 99 कसोटी सामने खेळला आहे.श्रीलंकेविरुद्ध मार्चमध्ये हिंदुस्थानी भूमीकर खेळकल्या जाणा?dया त्याच्या कारकिर्दीतील शतकी कसोटीत तो कर्णधार म्हणून खेळाका असे क्रिकेट बोर्डाला काटत होते. पण आता किराट नेतृत्काच्या बाबतीत समझोता करण्याच्या निणऱयाप्रत येण्यास मुळीच तयार दिसत नाहीय.

बीसीआयच्या ऑफरवर विराट म्हणाला, कारकिर्दीतील एका लढतीने काही फरक पडत नाही. मी असा विचार करणारा खेळाडू नाही. मला माझ्या वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघासाठी ऐतिहासिक विक्रम नोंदवण्यात आनंद मिळतो. कारकिर्दीतील 100व्या कसोटीत नेतृत्व करण्यासाठी मी पुन्हा कर्णधारपदाची वस्त्र परिधान करावी हे मला पटत नाहीय. त्यामुळे मला बोर्डाच्या ऑफरमध्ये स्वारस्य नाही. एक खेळाडू म्हणून मी टीम इंडियाला माझे योगदान जीव तोडून देण्याचा प्रयत्न करीन, तो माझा स्वभावच आहे, असेही विराटने स्पष्ट केले.

टी 20च्या कर्णधारपदावरून राजीनामा, वन डे संघाच्या नेतृत्वावरून उचलबांगडी

विराटने टी 20 विश्वचषकातील अपयशानंतर टीम इंडियाच्या टी 20 संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर बीसीसीआयने त्याची वन डे संघाच्या नेतृत्वावरून मात्र उचलबांगडी केल्याचे उघड झाले होते. आता दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवानंतर विराटने हिंदुस्थानी कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराचा शोध सुरू आहे. रोहित शर्माची हिंदुस्थानी टी 20 आणि वन डे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. आता कसोटी संघाच्या नेतृत्वपदाच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. के. एल. राहुल आणि रिषभ पंत हे दोघेही कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या रेसमध्ये आहेत.

विराटने अहंकार सोडून युवा नेतृत्वाखाली खेळावे!

कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला विराट कोहली याची संघनिष्ठा आणि खेळाबद्दलच्या प्रेमाबद्दल कोणीही शंका घेऊ शकणार नाही, पण आता कर्णधारपद सोडल्यावर त्याने आपला अहंकारही सोडून टीम इंडियाच्या भल्यासाठी नव्या कर्णधाराला मदत करावी. एक सर्वोत्तम फलंदाज म्हणून आपण विराटला गमावणे योग्य ठरणार नाही. आता विराटने एक खेळाडू म्हणून मुक्तपणे आपला नैसर्गिक खेळ करून संघाला पुन्हा क्रिकेटजगतात टॉपवर न्यावे, असा वडिलकीचा सल्ला हिंदुस्थानला पहिला विश्वचषक मिळवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीला दिला आहे.

कर्णधारपदात संघाला 68पैकी 40 कसोटींत मिळवून दिलाय विजय

विराट कोहली हा टीम इंडियाच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत 68 कसोटींत टीम इंडियाचे नेतृत्व केले. त्यातील 40 कसोटी हिंदुस्थानी संघाने जिंकल्या आहेत. विराट आणखी 2 वर्षे संघाच्या कर्णधारपदावर राहिला असता तर दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथचा सर्वाधिक कसोटी जिंकणारा कर्णधार हा विक्रम मोडू शकला असता पण आपल्याला वैयक्तिक विक्रमांत मुळीच रस नाही, असे सांगत विराटने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे.