परमबीर सिंह दुसऱयांदा गैरहजर, चौकशीसाठी एसीबीने बोलावले होते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी चौकशीकरिता एसीबीच्या वतीने परमबीर सिंह यांना समन्स धाडण्यात आले होते. मात्र मंगळवारी ते या चौकशीसाठी गैरहजर राहिले. कोरोनामुळे येऊ शकत नाही, असे कारण परमबीर यांनी दिले आहे.

खंडणीप्रकरणी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या आरोपांची खुली चौकशी एसीबीकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावून 10 जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यादिवशी सर्वेच्च न्यायालयात सुनावणी असल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही असे कारण परमबीर यांच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा समन्स जारी वरून मंगळवारी येण्यास सांगण्यात आले होते. मात्र मंगळवारी स्वत: हजर न राहता त्यांचे वकील एसीबीच्या कार्यालयात पोहोचले. परमबीर यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी तीन आठवडय़ांची मुदत द्यावी, असा अर्ज त्यांच्या कतीने वकिलाने केला असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.

घडय़ाळाच्या टिकटिकप्रमाणे मुंबईकरांचे आयुष्य कितीही संकटे आली तरी सुरूच असते. कोरोना लॉकडाऊनचा अपवाद वगळला तर या कष्टकऱयांचे कष्ट काही थांबलेले नाही. सकाळी घरातून निघून रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठल्यावर या कष्टकऱयाची नजर जाते ती स्टेशनबाहेरील या अजस्त्र घडय़ाळावर. सध्या या घडय़ाळाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मुंबईकरांना मात्र चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहे.